चीनच्या हुलनबुइर इथं सुरू असलेल्या आशियाई पुरूष हॉकी स्पर्धेत आज भारतानं दक्षिण कोरियाला नमवत सलग चौथा विजय नोंदवला जिंकले. भारतानं दक्षिण कोरियाचा ३-१ अशा गोलफरकानं पराभव केला. अराईजीत सिंग हुंदाल आणि कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या यांनी भारतासाठी गोल केले.
काल मलेशियाचा ८-१ असा दणदणीत पराभव करत, याआधीच भारत उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. गुणतालिकेतले पहिले चार संघ १६ सप्टेंबरला उपांत्य सामने खेळतील, तर अंतिम सामना १७ तारखेला होईल. भारतानं या स्पर्धेचं जेतेपद चारवेळा मिळवलं आहे.