जर्मनीत मॅग्डेबर्ग इथं झालेल्या भीषण हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात पाच लोक ठार तर दोनशेहून अधिक लोक जखमी झाल्याचं वृत्त आहे. जखमींमध्ये सात भारतीयांचाही समावेश होता. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात, नाताळच्या बाजारात झालेला हा हल्ला भीषण आणि माथेफिरू असल्याचं म्हटलं आहे. जखमी भारतीय नागरिकांवर रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. जर्मनीतील भारतीय दुतावास या हल्ल्यात झालेल्या जखमी झालेल्यांच्या संपर्कात असल्याचही निवेदनात म्हटलं आहे. नाताळाच्या खरेदीसाठी गर्दी केलेल्या बाजारात कार घुसवून शुक्रवारी हा हल्ला झाला होता.
Site Admin | December 22, 2024 1:39 PM | Germany | India