गेल्या आर्थिक वर्षात भारताकडून होणारी कॉफीची निर्यात १ अब्ज २९ कोटी डॉलर्स इतकी झाली असून आता भारत जागतिक स्तरावरचा सातव्या क्रमांकावरचा कॉफी उत्पादक देश बनला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. २०२०-२१ या काळात भारताने ७१ कोटी ९० लाख रुपये किमतीची कॉफी निर्यात केली होती. त्या तुलनेने गेल्या वर्षीची निर्यात दुप्पट असल्याचं मंत्रालयाने म्हटलं आहे. या महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात भारताने ९ हजार ३०० टनांहून अधिक कॉफी निर्यात केली असून इटली, बेल्जियम आणि रशिया या देशांनी ती कॉफी खरेदी केली आहे. भारतात, कर्नाटक या राज्यात कॉफीचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं त्यानंतर केरळ आणि तामिळनाडू या राज्यांचा क्रमांक लागतो.
Site Admin | January 20, 2025 8:24 PM | Coffee | India