भारत आणि चीन यांच्यातली विशेष प्रतिनिधींची 23 वी बैठक काल झाली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी बैठकीत सहभागी झाले होते. दोन्ही देशांमधल्या सीमा भागातल्या प्रश्नांवर योग्य, व्यवहार्य आणि दोन्ही बाजूंना मान्य होईल असा पर्याय शोधून शांततेसाठी प्रयत्न करण्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी राजकीय दृष्टीकोनातून चर्चा होणं महत्त्वाचं आहे या मुद्द्याचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला. त्यांनी परस्पर हिताच्या क्षेत्रिय आणि जागतिक मुद्द्यांवरदेखील चर्चा केली. डोभाल यांनी चीनचे उप राष्ट्राध्यक्ष हॅन झेंग यांच्यासोबतही संवाद साधला.