भारताबद्दल फार पूर्वीपासून आपल्याला कुतूहल होतंच, पण आता प्रत्यक्ष भारत भेटीमुळे आपण अचंबित झालो आहोत, अशी भावना चिलीचे राअध्यक्ष ग्रॅबियल बोरिक फॉन्ट यांनी आज व्यक्त केली. ते आज मुंबईत राजभवन इथे आले होते. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांचं स्वागत केलं. नवी दिल्ली इथे भारत आणि चिलीमध्ये ‘सामायिक आर्थिक भागीदारी करार’ झाला असून व्यापार आणि वाणिज्य याशिवाय आपला देश भारताशी कृषी उद्योग, संस्कृती, महत्वपूर्ण खनिज आणि विशेष करून चित्रपट निर्मितीमध्ये सहकार्य करण्यास उत्सुक असल्याचं ते यावेळी म्हणाले.
Site Admin | April 3, 2025 8:22 PM | chile | India
भारत भेटीमुळे अचंबित झाल्याची चिलीचे राअध्यक्ष ग्रॅबियल बोरिक फॉन्ट यांची प्रतिक्रिया
