भारतानं संयुक्त राष्ट्रांचं स्थायी सदस्यत्व आफ्रिकेच्या सहभागासह अधिक प्रातिनिधिक बनवण्याचं आवाहन केलं असून, सुरक्षा परिषदेतल्या राजकीय मतभेदांमुळे शांतता कार्यात बाधा येत असल्याचं अधोरेखित केलं आहे. संयुक्त राष्ट्रात भारताचे नवनियुक्त स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी काल सुरक्षा परिषदेला पहिल्यांदाच संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. सुरक्षा परिषदेला, विशेषतः कायम स्वरूपी सदस्यांनी आजच्या वास्तवाचं अधिक प्रतिनिधीत्व करायला हवं असं ते यावेळी म्हणाले. शांतता कार्यात भारताचं सर्वात मोठं योगदान राहिलं असून, गेल्या ७ दशकांमध्ये ५० पेक्षा जास्त मोहिमांमध्ये भारतानं आपले २५ लाखापेक्षा जास्त सैनिक तैनात केल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | September 10, 2024 1:26 PM | UNSC