भारत आणि ब्रिटन यांच्यात प्रस्तावित असलेल्या मुक्त व्यापार करारासाठी उद्यापासून चर्चा सुरू होणार आहे. या संदर्भात ब्रिटनचे व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड्स आणि भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे. १३ जानेवारी २०२२मध्ये या संदर्भातल्या बैठका सुरू झाल्या होत्या. डिसेंबर २०२३पर्यंत या बैठकांचे १३ टप्पे पूर्ण झाल्यानंतर मे २०२४ मध्ये ब्रिटनच्या निवडणुकांमुळे १४वा टप्पा प्रलंबित होता. या टप्प्यातली बैठक उद्यापासून सुरू होईल. द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढवणं हा या कराराचा उद्देश आहे. भारताचं माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आणि आरोग्य सेवांमधल्या कुशल व्यावसायिकांना ब्रिटनच्या बाजारपेठांमध्ये स्थान मिळावं तसंच, ब्रिटनहून येणारा मद्यपुरवठा, मांस आणि चॉकलेट आणि मिठाईवरच्या आयात शुल्कात कपात अशा मुद्यांवर चर्चा होणार आहे.
Site Admin | February 23, 2025 1:37 PM | Britain | India
भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या प्रस्तावित मुक्त व्यापार करारासाठी उद्यापासून चर्चा
