वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज बेल्जियमचे परराष्ट्र मंत्री बर्नार्ड क्विंटीन यांच्याशी ब्रसेल्स इथे द्विपक्षीय चर्चा केली. बेल्जियमचं परकीय व्यापारावरचं अवलंबित्व आणि भारताची गतिमान, वाढती अर्थव्यवस्था यांमुळे संबंध अधिक दृढ होतील, यावर दोन्ही पक्षांची सहमती झाली. तसंच, युरोपीयन महासंघ आणि भारताच्या मुक्त व्यापार करार वाटाघाटींच्या प्रगतीवरही द्विपक्षीय चर्चा झाली.