चीनमध्ये हुलुनबुईर इथं सुरु असलेल्या पुरुषांच्या आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर २-१ अशी मात केली. भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंह यानं भारताच्या बाजूनं दोन गोल केले. सहा संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळवली जात असून, १६ सप्टेंबर रोजी अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. स्पर्धेचा अंतिम सामना १७ सप्टेंबरला होणार आहे.
Site Admin | September 14, 2024 7:50 PM | Asian Champions Trophy | Hockey India
आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची पाकिस्तानवर २-१ अशी मात
