भारत आणि बांगलादेश आज त्यांच्या ताब्यात असलेल्या एकमेकांच्या मच्छीमारांची सुटका करणार आहेत. बांगलादेशच्या ताब्यात असलेले ९५ भारतीय मच्छीमार मायदेशी परतणार असून, भारत ९० बांगलादेशी मच्छिमारांना सोडणार आहे. याशिवाय काही नौका देखील परत केल्या जाणार आहेत. भारतीय मच्छीमार दोन महिन्यांहून अधिक काळ बांगलादेशातल्या तुरुंगात होते.
Site Admin | January 5, 2025 1:11 PM | Bangladesh | Fishermen | India
भारत आणि बांगलादेश ताब्यात असलेल्या एकमेकांच्या मच्छीमारांची सुटका करणार
