भारत ऑस्ट्रेेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराला दोन वर्षं पूर्ण होत असताना, या दोन्ही देशांमध्ये परस्परसंबधातून व्यापारवृद्धी आणि आर्थिक विकास यांची यशस्वी वाटचाल सुरु असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या करारावर स्वाक्षरी झाल्यापासून, द्विपक्षीय व्यावसायिक व्यापारात दुप्पटीने वाढ झाली. या यशाच्या पायावर भारत-ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य कराराची वाटचाल सुरु असून त्यासाठी आतापर्यंत यासाठी १० औपचारिक फेऱ्या आणि चर्चा झाल्या आहेत असं मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे.
Site Admin | December 29, 2024 3:08 PM | austrelia | India