भारत आणि अर्जेंटिना यांच्यात काल लिथियम उत्खनन आणि खाणकाम संदर्भात सहकार्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी आणि कॅटामार्काचे राज्यपाल राऊल अलेजांद्रो जीलील यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीत हा करार करण्यात आला. लिथियम उत्खनन आणि त्यातील गुंतवणूक संधींमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली.
दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय भागीदारी सुनिश्चित करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धोरणात्मक मुद्यांवर चर्चा केली. तसंच अर्जेंटिनाच्या खाण क्षेत्रात भारताचा सहभाग वाढवण्यासाठी ज्ञानाची देवाणघेवाण तसंच पायाभूत सुविधांच्या पुरवठ्यावर भर देण्यात आला. या सहकार्य करारामुळे लिथियम उत्खनन प्रकल्पांना गती मिळेल, तसंच संसाधन सुरक्षा वृद्धी होऊन भारतीय कंपन्यांसाठी नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.