डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

युक्रेन-रशिया दरम्यानच्या संघर्षावर उभय देशांनी मार्ग काढण्याचं भारताचं आवाहन

युक्रेन आणि रशिया या देशांनी सद्यस्थितीत सुरू असलेल्या संघर्षावर मार्ग शोधला पाहिजे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभय देशांना केलं. युक्रेनच्या दौऱ्यात, शांतता प्रस्थापित करण्याच्या सर्व प्रयत्नांमध्ये भारत सक्रीय भूमिका निभावेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.

 

युक्रेनचे राष्ट्राअध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत भेटीदरम्यान मोदी यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. मोदी म्हणाले की, लोककेंद्रीत दृष्टीकोन ठेवून शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांची सक्रीय योजना भारतानं आखली आहे. भारत नेहमीच सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडत्वाचे समर्थन करतो.

 

रशियाच्या दौऱ्याविषयी बोलताना मोदी म्हणाले की,युद्धभुमीवर कोणत्याही समस्येचा तोडगा सापडत नाही, तर केवळ चर्चा, संवाद आणि मुत्सद्देगिरी यांच्या जोरावर मार्ग सापडत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. याचवेळी, युक्रेन-रशिया संघर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्यात भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना देशाबाहेर जाण्यात मदत केल्याबद्दल त्यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे आभार मानले तसंच भारत कोणत्याही मानवतावादी मदतीस तयार असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

भारत-युक्रेन दरम्यान काल कीव इथं दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये शिष्टमंडळ स्तरीय बैठक पार पडली. पंतप्रधानांचा हा दौरा काल संपला. या दौऱ्याविषयी प्रसारमाध्यमांविषयी माहिती देताना, परराष्ट्रव्यवहार मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, उभय देशांदरम्यान द्विपक्षीय संबंध, व्यापार, आर्थिक समस्या, संरक्षण, औषध निर्मिती आणि शेती या विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाली. तसंच युक्रेन संघर्षावरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं जयशंकर यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा