डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

द्विपक्षीय व्यापारात अडथळा आणणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी भारत आणि कतार यांचा वचनबद्ध होण्याचा निर्धार

भारत आणि कतार यांनी द्विपक्षीय व्यापारात अडथळा आणणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी वचनबद्ध होण्याचा निर्धार केला आहे. 10 जुलैला दोहा इथं दोन्ही देशांच्या वाणिज्य विभाग आणि इतर मंत्रालयांच्या शिष्टमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी रत्ने आणि दागिने, स्थानिक चलनातील व्यापार, औषधनिर्माण, अन्न प्रक्रिया, एमएसएमईमधील सहकार्य आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली. भारत हा कतारचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश असून 2023-24 मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार 14 अब्ज यूएस डॉलर्सपेक्षा जास्त होता. या शिष्टमंडळाची पुढील बैठक 2025 मध्ये नवी दिल्लीत होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा