भारत आणि बांगलादेश यांच्यातली ५५ वी महासंचालक स्तरीय सीमा परिषद आज नवी दिल्लीत झाली. भारतातर्फे सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक दलजित सिंंह चौधरी आणि बांगलादेशच्या बॉर्डर गार्डचे महासंचालक मेजर जनरल मोहम्मद सिद्दीकी यांनी भाग घेतला. या परिषदेत घुसखोरी, सीमा भागातले गुन्हे, सीमेवर तारेचं कुंपण, तस्करी आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. सीमाभागातल्या लोकांच्या मानव अधिकाराचं रक्षण आणि सीमेवरील हिंसाचार कमी करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
Site Admin | February 20, 2025 8:50 PM | Bangladesh | India
भारत आणि बांगलादेश यांच्यात ५५वी महासंचालक स्तरीय सीमा परिषद
