भारत आणि ऑस्ट्रेलियानं सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी सर्वसमावेशक आणि शाश्वत धोरण आखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य बळकट करण्याची गरज अधोरेखित केली आहे. नवी दिल्ली इथं काल पार पडलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया दहशतवादविरोधी संयुक्त कृती गटाच्या १४व्या बैठकीनंतर हे निवेदन जारी करण्यात आलं आहे. स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर दहशतवादाच्या धोक्याविषयी यावेळी चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे. नव्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा दहशतवादासाठी होणारा दुरुपयोग, इंटरनेटच्या माध्यमातून दहशतवादासाठी पैसा गोळा करणं, कट्टरतावाद पसरवणं, संघटित गुन्हे आणि दहशतवाद यांच्यातले थेट संबंध याकडेही या बैठकीत लक्ष वेधलं गेलं.
Site Admin | August 14, 2024 1:15 PM | Australia | India