नागपूरच्या सुप्रिया कुमार मसराम यांनी संविधानातली ७५ कलमं तोंडपाठ म्हणून दाखवण्याचा विक्रम केला आहे. त्यासाठी त्यांनी दहा मिनिटांचा कालावधी निश्चित केला होता, पण त्यांनी अवघ्या ६ मिनिटं २१ सेकंदांत, उपस्थितांपुढे भराभर कलमं सांगून विक्रम केला. तर त्यांचा ११ वर्षांचा मुलगा शिवांशनं विज्ञानाच्या पुस्तकातल्या शंभर पानांवर अधोरेखित असलेले शब्द न पाहता उपस्थितांना अवघ्या ८ मिनिटं पाच सेकंदांत अचूक सांगितले.
एकाचवेळी निर्धारित वेळेच्या आधी आपापलं उद्दिष्ट गाठत या मायलेकांनी इंडिया आणि आशिया रेकॉर्डस बुकमध्ये नोंद केली.
इंडिया आणि आशिया बुक रेकॉर्डसचे संयोजक डॉ. मनोज तत्ववादी यांच्या हस्ते या दोघांना पदक, आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं.