आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, विवादांचं शांततापूर्ण निराकरण करण्यासाठी आणि सागरी सुरक्षा राखण्यासाठी शांती आणि स्थिरतेला प्रोत्साहन देण्यावर भारत आणि आसियान राष्ट्रांनी भर दिला आहे. भारत आणि असियान देशांच्या संयुक्त निवेदनात याबाबत सहमति दर्शवण्यात आली आहे.
सागरी सुरक्षा, दहशतवादाला विरोध, सायबर सुरक्षा, आंतरराष्ट्रीय गुन्हे, संरक्षण उद्योग, मानवतेसाठी मदत आणि आपत्ती निवारण, शांतता आणि आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उपायांसाठी सहकार्य करण्यावर भारत आणि आसियान देशांनी सहमती दर्शविली आहे.