डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 15, 2025 8:30 PM | India and America

printer

दहशतवादी कारवायांबद्दल माहिती मिळाल्यानंतर उच्चस्तरीय चौकशी समितीचा अहवाल सादर

भारत आणि अमेरिकेच्या सुरक्षेला बाधा पोहोचवणाऱ्या काही संघटित गुन्हेगारी गटांच्या आणि दहशतवादी संघटनांच्या कारवायांबद्दल अमेरिकी अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीनं आज आपला अहवाल सादर केला. केंद्रीय गृहमंत्रालयानं ही माहिती दिली. या चौकशीदरम्यान एका व्यक्तीचे गुन्हेगारी लागेबांधे आणि पार्श्वभूमी उघड झाली असून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची शिफारस या समितीनं केली आहे.  नोव्हेंबर २०२३ मधे ही समिती स्थापन झाली. या समितीला अमेरिकी अधिकारी सहकार्य करत आहेत. भारताची प्रतिसाद क्षमता वाढवण्यासाठी, योग्य नियंत्रणासाठी आणि समन्वय साधत दहशतवादाच्या विरोधातल्या मोहिमांसाठी अंमलबजावणी प्रक्रियेत सुधारणा करण्याची शिफारसही या समितीनं केली आहे, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा