डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारताचं जहाज बांधणीच्या क्षेत्रात २०३० पर्यंत पहिल्या दहांमध्ये स्थान मिळवण्याचं उद्दिष्ट – प्रल्हाद जोशी

भारतानं जहाज बांधणीच्या क्षेत्रात २०३०पर्यंत पहिल्या दहांमध्ये तर २०४७पर्यंत पहिल्या पाचात स्थान मिळवण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं केंद्रीय नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. जर्मनीतल्या हॅम्बर्ग सस्टेनिबिलिटी परिषदेत ते बोलत होते. अक्षय उर्जा क्षेत्रातल्या भारताच्या प्रगतीचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. २०१४पासून भारताने आपल्या नवीकरणीय उर्जा क्षमतेमध्ये परिवर्तनात्मक वाढ केली असल्याचंही ते म्हणाले. गेल्या दहा वर्षांत देशाची सौर उर्जा निर्मितीची क्षमता ३३ पटीने वाढली असून शाश्वत उर्जास्रोतांच्या शोधात भारत आज जागतिक पातळीवर समर्थपणे उभा असल्याचंही जोशी यांनी सांगितलं.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा