डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

राज्यात सर्वत्र स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करण्यात येत आहे.

 

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी पुण्यातल्या राजभवनात राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. राज्यपालांनी उपस्थित लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

Image 

 

Image

 

मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. राज्य शासन राज्याचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले की, विविध योजनांच्या माध्यमातून विकासाला चालना देण्याचं काम सुरु आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली असून युवकांना रोजगारासाठी प्रशिक्षण, विद्यावेतन, गोरगरीब, दुर्बलांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर, शेतकऱ्यांना वीज सवलत, मुलीना संपूर्ण व्यवसायिक शिक्षण मोफत अशा अनेक योजना सुरु केल्याचंही त्यांनी सांगितले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Image

 

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

 

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर मध्ये ध्वजारोहण झालं.

 

Image

 

छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात राज्याचे  अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

 

Image

 

बीडमध्ये राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला.

 

Image

 

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. भंडारा इथं पोलिस कवायती मैदानात पालकमंत्री विजयकुमार गावीत यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. यवतमाळ इथं पालकमंत्री संजय राठोड आणि गोंदियात पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या ध्वजारोहण करण्यात आलं.

 

Image

 

कोल्हापूर इथं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तर सातारा इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आणि सांगली इथं कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं. धाराशीव मध्ये आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत तर जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. धुळ्यात पालकमंत्री गिरीष महाजन आणि जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 

Image 

 

लातूरचे मुख्य शासकीय ध्वजारोहण क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं.

 

Image

 

रत्नागिरी जिल्ह्याचा ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तर सिंधुदुर्गनगरी इथं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.

 

Image

 

चंद्रपुरात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तिरंगा फडकावला. नंदुरबार मध्ये पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.

 

 

मुंबई महापालिकेत आयुक्त भूषण गगराणी, नवी मुंबईत कोकण विभागीय महसूल आयुक्त पी. वेलरासू, सोलापूर जिल्ह्याधिकारी कुमार आशीर्वाद परभणीत जिल्हाधिकारी रघुनाथ गावजे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.

 

Image

 

हिंगोलीत जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. गडचिरोलीत जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

 

अकोला इथं स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात स्वातंत्र्यसैनिक, शहिद सैनिक यांचे कुटुंबिय, उत्कृष्ट अधिकारी आणि विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा