डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारत आणि मलेशिया यांच्यात व्यापार वाढवणं महत्वाचं – मंत्री पियूष गोयल

भारत आणि मलेशिया यांच्या दरम्यान व्यापार वाढवणं महत्वाचं असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत झालेल्या भारत-मलेशिया सीईओ मंचावरुन ते बोलत होते. दोन्ही देशातल्या उद्योग आणि व्यापाराला बळकटी देण्यासाठी सहकार्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, पर्यटन, डिजिटल अर्थव्यवस्था आदी क्षेत्रांमध्ये दोन्ही देश परस्परांना सहकार्य करू शकतात असं गोयल यांनी म्हटलं आहे. तेल आणि वायू उद्योगात भारत प्रगती करत असून मलेशियन कंपन्यांना यात अनेक संधी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा