मतदान केंद्रांवरची गर्दी टाळण्यासाठी मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात यावी, तसंच मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याकडे केली आहे. पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी आज चोक्कलिंगम यांची भेट घेतली आणि विविध मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. मतदान यंत्रांच्या बॅटरीवरून सुरू असलेला वाद थांबवण्यासाठी मतदान सुरू करताना आणि बंद होताना मतदान यंत्रांमधल्या बॅटरी किती चार्ज होत्या, याची नोंद ठेवण्यात यावी, अशी मागणीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पत्राद्वारे केली आहे.