भारतातून हज यात्रेला जाणाऱ्यांचा कोटा वाढवून आता १ लाख ७५ हजार केला असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाने दिली आहे. हा कोटा २०१४ पासून १ लाख ३६ हजार यात्रेकरूंचा होता . मंत्रालयाने हाज कमिटीमार्फत १ लाख २२ हजार यात्रेकरूंच्या विमान तिकीटांची आणि इतर व्यवस्था सौदी अरेबियाच्या नियमांप्रमाणे केली असून उरलेल्या यात्रेकरूंची व्यवस्था खाजगी यात्रा कंपन्यांकडे सोपवली असल्याचं मंत्रालयाने म्हटलं आहे.