भारताला प्रत्येक क्षेत्रात ‘आत्मनिर्भर’ करण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार दूरसंचार आणि नेटवर्किंग उत्पादनांसाठीच्या तसेच इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या मोठ्या प्रमाणातील इलेक्ट्रॉनिक उत्पादनासाठी पीएलआय अर्थात उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन योजनेमुळे देशातील उत्पादन, रोजगार निर्मिती, आर्थिक विकास आणि निर्यातीमध्ये वाढ झाली असल्याचं दूरसंचार आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं म्हटलं आहे. दूरसंचार विभागासाठी पीएलआय लागू केल्यापासून तीन वर्षांच्या कालावधीत, या योजनेत 3 हजार 4 शे कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित झाली असून, दूरसंचारसंबंधी उपकरण उत्पादनांनी 50 हजार कोटी रुपयांचामहत्त्वाचा टप्पा पार केला आहे. या साहित्याची एकंदर निर्यात अंदाजे 10 हजार 5 शे कोटी रुपयांवर पोहोचली आहेआणि त्यातून 17 हजार 8 शे प्रत्यक्ष तर मोठ्या प्रमाणात अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती झाली असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.
Site Admin | July 11, 2024 12:53 PM | नरेंद्र मोदी | पीएलआय