क्षयरोग रूग्णांचा पोषण आहार वाढवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे दिलं जाणाऱं पोषण आहार सहाय्य ५०० रुपयांवरुन एक हजार रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत नी-क्षय मित्र उपक्रमाच्या विस्ताराला आणि क्षयरोग रुग्णांच्या कुटुंबांचाही या योजनेत समावेश करायला परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्व क्षयरोग रुग्णांना आता नि-क्षय पोषण योजने अंतर्गत ३ हजार ते ६ हजार रुपयांपर्यंत पोषण सहाय्य मिळेल. त्याचा दरवर्षी २५ लाख क्षयरुग्णांना फायदा होईल, असंही नड्डा म्हणाले. या उपक्रमासाठी सरकारला अतिरिक्त १ हजार ४० कोटी रुपये खर्च होतील, असंही त्यांनी सांगितलं.