गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात पाऊस जास्त झाल्यानं कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ, अतिसार यासारख्या जलजन्य आजारांचे रुग्ण वाढले आहेत. या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग उपाययोजना करत असून सर्वाधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता असलेल्या गावांची यादीही तयार करण्यात येत आहे. यंदा जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत जलजन्य आजारांमुळे राज्यात १० रुग्ण दगावल्याचं आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आलं आहे.
Site Admin | September 4, 2024 12:19 PM | colara | gastro | kavil