ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली वीज कंपन्यांतल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात १९ टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ देण्यात येत असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री अतिथी गृहात ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालच्या वीज कंपन्यांतल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत बैठकीत ते आज बोलत होते.
या वीज कंपन्यात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांचा समावेश आहे. सहाय्यकांना परिविक्षाधीन कालावधीकरता पाच हजार रुपयांची वाढ आणि तांत्रिक कर्मचारी यांना मिळणारा रू.५००/-चा भत्ता दुप्पट करण्यात आला आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीत तिनही कंपन्यांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.