डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 13, 2025 6:05 PM

printer

मीटरवर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात दरवाढ होणार

मीटरवर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात या आठवड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढीमुळे सरकारकडे रिक्षा, टॅक्सीचालक संघटना, एसटी महामंडळ आणि इतर शहरांतील परिवहन उपक्रमांनी भाडेवाढीसंदर्भात विविध प्रस्ताव दिले आहेत. यासंदर्भात बुधवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत एकत्रित निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ही दरवाढ किमान १५ टक्के असण्याची शक्यता आहे. रिक्षा, टॅक्सीच्या भाड्यात ३ ते ४ रुपयांनी, तर बसच्या तिकीट दरामध्ये १ ते ५ रुपयांनी वाढ होऊ शकते. यापूर्वी सप्टेंबर २०२२ मध्ये रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ झाली होती.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा