डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

लोकसभेत प्राप्तिकर विधेयक सादर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत प्राप्तिकर विधेयक २०२५ सादर केलं. स्थायी समितीकडे हे विधेयक पाठवायचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. प्राप्तिकराशी संबंधित कायद्यात सुधारणा करण्याच्या उद्देशानं हे विधेयक मांडलं आहे. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवं प्राप्तिकर विधेयक आणण्याची घोषणा केली होती. दरम्यान, लोकसभेचं पहिल्या टप्प्याचं कामकाज पूर्ण झाल्यामुळे येत्या १० मार्च पर्यंत सदनाचं कामकाज स्थगित करण्यात आलं. 

 

वक्फ (दुरुस्ती) विधेयक २०२४ बाबतच्या संयुक्त समितीचा अहवाल आज संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला.  विरोधी सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं आणि राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा