चालू आर्थिक वर्षात आयकर विभागानं कालपर्यंत १९ लाख २१ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त करसंकलन केलं आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत, या वेळी त्यात २० पूर्णांक ३२ शतांश टक्के वाढ झाली आहे. आयकर विभागानं त्यानंतर ३ लाख ३८ हजार कोटी रुपये परतावा म्हणून दिले आहेत. त्यामुळे निव्वळ प्रत्यक्ष करसंकलन १५ लाख ८२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं असून त्यात १६ टक्क्यापेक्षा जास्त वाढ झाली आहे.
Site Admin | December 18, 2024 7:44 PM | Income Tax Department
आयकर विभागाचं १९ लाख २१ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त करसंकलन
