डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नीती आयोगाचं संपूर्णता अभियानात राज्यातल्या २७ तालुक्यांचा समावेश

महाराष्ट्रात अमरावती, बीड, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, जालना, नंदुरबार, हिंगोली, नाशिक, धाराशिव, पालघर, सोलापूर, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधल्या, एकूण २७ तालुक्यांचा या अभियानात समावेश झाला आहे.

 

यवतमाळ जिल्ह्यातल्या झरी जामणी या आकांक्षित तालुक्यात आज संपूर्णता अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं. आरोग्य आणि पोषण या क्षेत्रात सर्वांनी एकत्र येऊन काम करावं अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यावेळी दिल्या. या क्षेत्रात काम करणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि एएनएम यांच्या कामाचं जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थितांनी आकांक्षित तालुक्याला सक्षम आणि समृद्ध करण्याची प्रतिज्ञा केली. 

 

हिंगोली तालुक्यातही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत संपूर्णता अभियानाला सुरुवात झाली. सर्व निकष मुदती आधीच पूर्ण करण्यात येतील असं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं. तसंच तालुक्यातल्या सर्व ग्रामपंचायतींना ५ आणि ६ जुलै रोजी ग्रामसभा घेण्याचे निर्देश दिले. 

 

 

पालघर जिल्ह्यातल्या डहाणू आणि जव्हार तालुक्यात आज संपूर्णता अभियानाला सुरुवात झाली. डहाणू इथं पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या उपस्थितीत सर्वांनी संपूर्णता अभियान यशस्वीरित्या पार पाडण्याची प्रतिज्ञा घेतली. 

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा