डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मतदार जनजागृतीसाठी ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या विशेष अभियानाचा शुभारंभ

विधानसभा निवडणूकीत निवडणूक आयोगाच्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृतीसाठी ‘उत्सव निवडणुकीचा,अभिमान महाराष्ट्राचा’ या विशेष अभियानाचा शुभारंभ काल मुंबईत करण्यात आला. यावेळी ‘ये पुढे मतदान कर’ या महाराष्ट्र मतदान गीताचं लोकार्पण करण्यात आलं. याअंतर्गत राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती अभियान कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे सदिच्छा दूत श्रीगौरी सावंत आणि निलेश सिंगीत, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, मतदार गीताचे गायक मिलिंद इंगळे, दिग्दर्शक रोहित शेट्टी, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

छत्रपती संभाजीनगर इथं या कार्यक्रमाचा शुभारंभ स्मार्ट सिटी सभागृहात करण्यात आला. आपल्या देशाची निवडणूक प्रक्रिया ही जगात आदर्श आणि पारदर्शक आहे, जास्तीत जास्त लोकांचा प्रतिनिधित्व करणारा प्रतिनिधी पाहिजे, त्याकरता सर्वांनी मतदान करणं आवश्यक असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
याअंतर्गत नांदेड जिल्हास्तरीय कार्यक्रम शहरातल्या तिरंगा ध्वज कॉर्नर या ठिकाणी घेण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात नांदेडकरांनी मतदान करण्याची शपथ घेतली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा