उद्योजकांना सर्व सुविधा पुरवण्याचा निर्णय सरकारने घेतला असून हे राज्य आता उद्योगस्नेही झालं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज नवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात उद्योग क्षेत्राला रेड कार्पेट सुविधा तसंच एक खिडकी योजना असल्यामुळे राज्यात उद्योग क्षेत्र विकसित होत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
केंद्र सरकारच्या मदतीने स्वतःची इको सिस्टम तयार करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य बनल्याचं उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस म्हणाले. तर या प्रकल्पातून ४ हजार रोजगार निर्माण होणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.