स्वच्छ भारत अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशात येत्या 17 तारखेपासून 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या मोहिमेत कार्यालयं, आस्थापनांमध्ये स्वच्छता राखण्याच्या दृष्टिनं विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. स्वच्छता हा एक संस्कार बनावा यासाठी यामध्ये प्रयत्न केले जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.