दिल्लीत भारत ब्रँड आटा आणि तांदूळ च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन आज ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना रास्त भाव मिळावा यासाठी सरकारनं हे पाऊल उचलल्याचं ते यावेळी म्हणाले. भारत ब्रँड आटा ३० रुपये किलो आणि भारत ब्रँड तांदूळ ३४ रुपये किलो दराने उपलब्ध आहे. भारत ब्रँड पदार्थांच्या विक्रीमुळे या गरजेच्या खाद्यपदार्थांच्या किमती कमी होण्यास मदत होईल असही त्यांनी सांगितलं.
Site Admin | November 5, 2024 1:46 PM
भारत ब्रँड आटा आणि तांदळाच्या दुसऱ्या टप्प्याचे प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते उद्घाटन
