डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मध्य प्रदेशात प्राईम मिनिस्टर कॉलेज ऑफ एक्सलंसचं अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

 मध्य प्रदेशातल्या सर्व ५५ जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट आणि उच्च दर्जाचं शिक्षण देण्यासाठी प्राईम मिनिस्टर कॉलेज ऑफ एक्सलंसचं उद्घाटन केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल इंदूर इथं झालं.

 

मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव यावेळी उपस्थित होते.नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केल्याबद्दल आणि आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातल्या मुलांना लाभदायक वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम हिंदीमध्ये सुरू केल्याबद्दल शाह यांनी मध्य प्रदेश सरकारचं कौतुक केलं.