सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्लेमध्ये वेंगुर्ले नगर परिषद आणि बॅरिस्टर नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट संस्थेच्या सहयोगातून उभारलेल्या बॅरिस्टर नाथ पै समुदाय केंद्राचं काल लोकार्पण झालं. या कार्यक्रमाला खासदार नारायण राणे, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. हे केंद्र विचारांचं आदानप्रदान करणारं केंद्र असायला हवं असं प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी केलं. वेंगुर्ल्यात लवकरात लवकर एमपीएससी आणि यूपीएससी अभ्यास वर्ग सुरू करण्यासाठी शंभर टक्के योगदान द्यायला तयार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.
Site Admin | September 15, 2024 3:47 PM | Nath Pai Community Center