येत्या २५ तारखेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नदी जोड प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज पुण्यात ही माहिती दिली. गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत, कृषी आर्थिक संशोधन केंद्राच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात चौहान बोलत होते. कमी पाण्यात अधिकाधिक सिंचन व्यवस्था विकसित करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. संपूर्ण जगासाठी भारत हे अन्नधान्याचं कोठार होण्याच्या दृष्टीने सरकार पूर्ण प्रयत्न करत असल्याचं चौहान यांनी सांगितलं. कीटकनाशकांचा अनियंत्रित वापर कमी करून, नैसर्गिक शेतीवर भर देण्याचं आवाहन चौहान यांनी यावेळी केलं.
Site Admin | December 23, 2024 8:19 PM | Shivraj Singh Chouhan
येत्या २५ तारखेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नदी जोड प्रकल्पाचा शुभारंभ
