डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 13, 2024 6:58 PM | DCM Devendra Fadnavis

printer

‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेसाठी नोंदणी वेबपोर्टलचे उद्घाटन

‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या संकेतस्थळाचं लोकार्पण आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झालं. आगामी काळात सौर कृषिपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल, असं फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं. योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं आणि भित्तीपत्रकाचं प्रकाशनही फडणवीस यांच्या हस्ते यावेळी झालं. काही लाभार्थी शेतकऱ्यांशी फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या योजनेत गेल्या सहा महिन्यात दोन लाख शेतकऱ्यांची निवड झाली असून त्यापैकी ४५ हजार शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप बसवण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा