ऑस्ट्रेलियात ब्रिसबेन इथं भारताच्या पहिल्या महावाणिज्य दुतावासाचं परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी आज उद्घाटन केलं. भारत – ऑस्ट्रेलिया यांच्यात दीर्घकाळापासून घनिष्ठ संबंध असून, व्यापार तसंच शैक्षणिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी योगदान देणार असल्याचं एस जयशंकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं. बैठकीदरम्यान, दोन्ही नेत्यांनी भारत आणि क्वीन्सलँडमधील आर्थिक, व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य मजबूत करण्याच्या संधी आणि मार्गांवर चर्चा केली.
Site Admin | November 4, 2024 1:52 PM | Australia
ऑस्ट्रेलियात भारताच्या पहिल्या महावाणिज्य दुतावासाचं उद्घाटन
