देशाची सौर ऊर्जा निर्मिती क्षमता ३२ पटीने तसंच जीवाश्मेतर इंधन निर्मिती क्षमता तिप्पट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. द्वारका इथं आजपासून सुरू झालेल्या भारत ऊर्जा सप्ताहाचं प्रधानमंत्र्यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. पॅरीस जी-२० कराराचं उद्दिष्ट साध्य करणारा भारत पहिला देश असल्याचंही ते म्हणाले. गेल्या दशकभरात भारताच्या अर्थव्यवस्थेने दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली असंही प्रधानमंत्री म्हणाले.
जगभरातले देश भारताचा गौरव करत असल्याचं प्रधानमंत्री मोदी म्हणाले.
Site Admin | February 11, 2025 1:41 PM | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी | भारत ऊर्जा सप्ताह
भारत ऊर्जा सप्ताहाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने उद्घाटन
