मुंबई विद्यापीठाच्या जैवभौतिकशास्त्र विभागात गॅमा इरॅडिएशन चेंबरचं नुकतंच उदघाटन झालं. या सुविधेमुळे देशभरातल्या शैक्षणिक संस्था आणि संशोधकांसाठी किरणोत्सर्ग संशोधन क्षेत्रातल्या संधीचं दालन खुलं झालं आहे. या सुविधेमुळे आरोग्यसेवा, अन्न प्रक्रिया, साहित्य विज्ञान आणि अभियांत्रिकी यासारख्या क्षेत्रांना चालना मिळणार आहे. यावेळी आयोजित कार्यशाळेत किरणोत्सर्ग आणि किरणोत्सर्ग जीवशास्त्र क्षेत्रातल्या शास्त्रज्ञांनी विविध पैलूंवर प्रकाश टाकला तसेच काही प्रात्यक्षिकं सादर केली.
Site Admin | December 2, 2024 7:35 PM | mumbai university