संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत बॅटलफील्ड सर्व्हेलन्स सिस्टम – संजयचं उद्घाटन केलं. या वर्षी मार्चपासून तीन टप्प्यात ही यंत्रणा भारतीय सैन्यात समाविष्ट केली जाईल. ही प्रणाली विशाल भू-सीमांवर लक्ष ठेवण्यासाठी, घुसखोरी आणि हल्ले रोखण्यासाठी आणि युद्ध परिस्थितीचं अचूक विश्लेषण करायला मदत करेल.
ही प्रणाली सैन्याची गुप्तचर आणि देखरेखीची क्षमता वाढवायला मदत करेल. संजय यंत्रणा भारतीय लष्कर आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांनी संयुक्तपणे स्वदेशी पद्धतीनं विकसित केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कर्तव्य मार्गावर संजय प्रणाली हे मुख्य आकर्षण असेल.