अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालं.
अन्यायाची जाणीव करून देणं आणि त्याविरोधात लढण्याची प्रेरणा देण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यानं केलं. त्यांच्या साहित्यानं राज्यात क्रांतीकारक परिवर्तन घडवून आणलं, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सरकार निर्णय घेतं, त्यानुसारच अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.