दुपारी ठाण्यात ३२ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. ठाणे शहरात होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.
ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो आणि घाटकोपर जवळच्या छेडा नगरपासून ठाण्यातल्या आनंद नगरपर्यंतच्या पूर्वमुक्त महामार्गाच्या विस्तारीत भागाची पायाभरणी प्रधानमंत्री करतील. याशिवाय नैना अर्थात नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्रातल्या विकासकामांच्या पहिल्या टप्पा, ठाणे महापालिकेच्या नव्या इमारतीचं भूमीपूजनही प्रधानमंत्री करतील. बीकेसी ते आरे दरम्यानच्या मेट्रो ३ चं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ते मेट्रोतून प्रवासही करणार आहेत. प्रवासादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी, विद्यार्थी आणि कामगार यांच्याशी संवाद साधतील. याशिवाय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत.
Site Admin | October 5, 2024 3:09 PM | PM Modi | Thane