केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी आज सिंगापूर इथल्या इन्व्हेस्ट इंडियाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. हे कार्यालय भारतात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या कंपन्यांसाठी मध्यवर्ती केंद्र म्हणून काम करेल. तसंच विविध क्षेत्रातील सहकार्याला प्रोत्साहन देईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला केलेल्या सिंगापूर दौऱ्यात या कार्यालयाच्या स्थापनेची घोषणा केली होती. सिंगापूरमध्ये उद्घाटन केलेलं हे इन्व्हेस्ट इंडियाचं परदेशातील पहिलंच कार्यालय आहे.
यावेळी गोयल म्हणाले की, हे कार्यालय सिंगापूरसह आणि आसियान क्षेत्राबरोबर आर्थिक सहकार्य मजबूत करण्याच्या प्रयत्नातील एक नवा अध्याय आहे. देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेत जागतिक गुंतवणूकदारांना विना अडथळा गुंतवणूक करता यावी यासाठी सरकार येत्या काही महिन्यांत परदेशात इन्व्हेस्ट इंडियाची अनेक कार्यालये उघडणार आहे, असं गोयल यांनी सांगितलं.