‘पोलाद क्षेत्रात हरितक्रांती- शाश्वत नवोन्मेष’ या दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन केंद्रीय पोलाद राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. या कार्यक्रमाला संबोधित करताना वर्मा यांनी स्टील क्षेत्रात शाश्वत कार्यपद्धती आणि नवनिर्मितीवर भर देण्याचं महत्त्व अधोरेखित केलं.
ही परिषद म्हणजे या क्षेत्रातले तज्ञ आणि संबंधितांमध्ये संवाद वाढवणारं व्यासपीठ असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारतीय पोलाद क्षेत्रासंबंधीची २०२४ ची स्मरणिका आणि पुस्तिकेचं प्रकाशनही वर्मा यांच्या हस्ते या कार्यक्रमात झालं.