डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महिला क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 8 खेळाडू राखून केला पराभव

महिलांच्या ICC T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल रात्री शारजा इथं झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 8 खेळाडू राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत बांगलादेशने 20 षटकांत 8 खेळाडू बाद 103 धावा केल्या.

 

बांगलादेशकडून कर्णधार निगार सुलतानाने 44 चेंडूत 39 धावा केल्या. वेस्ट इंडिजच्या करिश्मा रामहरकने बांगलादेशचे 4 गडी बाद केले. आज अ गटात, गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा सामना पाकिस्तान महिला संघाबरोबर – दुबई मध्ये होईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा