निपाह व्हायरसच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडू सरकारने सीमाभागातल्या जिल्ह्यात अधिक दक्षता बाळगण्यास सुरुवात केली आहे. निलगिरी जिल्ह्यात आजपासून स्क्रिनिंग आणि निगराणी सुरू करण्यात आली आहे. तसंच केरळमधून येणारे नागरिक आणि पर्यटकांची चाचणी करण्यात येत आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांची स्क्रिनिंग करण्यासाठी राज्य सरकारने पंधरा टीम तैनात केल्या आहेत.
Site Admin | July 23, 2024 12:58 PM | तमिळनाडू | निपाह व्हायरस